रविवार, ४ डिसेंबर, २०१६

पैसा किती मिळवावा

पैसा किती मिळवावा ?

फेसबुकवर एका तरुणाची ह्या शीर्षकाची पोस्ट पाहून भरून आले. मूळ पोस्ट अशी :

“किती पैसा कमावला म्हणजे 

माणूस श्रीमंत समजावा?

याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे,

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, 

मुलाबाळांचे रक्षण करता यावे, 

आईवडिलांची काळजी घेता यावी.

अब्रूने जगता यावे, 

इतका पैसा जवळ असला 

की तो मनुष्य श्रीमंत समजावा...”

अगदी सामान्यांना वाटावे,पटावे असे हे विचार प्रथम दर्शनी किती सालस वाटतात. पण खरेच तुकाराम महाराज असे म्हणाले होते ? आणि कुठे ? ह्याचा शोध घेताना एका मुलाने प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताचा अर्थ कसा लावला त्याची आठवण आली. ( त्याला विचारले होते, “तमसो मा ज्योतिर्गमय ”चा अर्थ काय ? व त्याने त्याचा अर्थ केला होता, “तुम सो जाव मा, मै ज्योती के घर जा रहा हूं !” ). असेच काहीसे तर झाले नाही ना इथे ?

वरची पोस्ट लिहिणारा मुलगा अगदी तरुण असून अजून त्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला नसावा. कारण गृहस्थाश्रमाचे फळ सांगताना तुकाराम महाराज म्हणतात :

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥

उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥

परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥2॥

भूतदया गाई पशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥3॥

शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट  । वाढवी महत्व  वडिलांचें ॥4॥

तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥

( अर्थ : अहो जन हो, तुम्ही चांगला व्यापार करून द्रव्य मिळवा आणि त्याचा खर्च उदासीन विचाराने करा. असा जो करील त्याला उत्तम गति मिळेल आणि चांगल्या मनुष्ययोनी मध्ये जन्म घेऊन उत्तम भोग भोगील. दुसऱ्यावर नेहमी उपकार करतो व दुसऱ्याची निंदा करण्याचे जाणत नाही आणि परस्त्रिया आपल्या आईबहिणीसारख्या सर्व काळ मानतो. सर्व भूतांचे ठिकाणी दया करून गाई वगैरे पशूंचे पालन करतो आणि तृषित लोकांना अरण्याचे ठिकाणी पाणी पिण्याकरिता आड, विहिरी यथाशक्ती निर्माण करतो. आपली वृत्ती शांत असून कोणाशी वाईटपणाने वागत नाही व आपल्याहून जे श्रेष्ठ आहेत त्यांची महती वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात, गृहस्थाश्रमाचे हेच मुख्य फळ आहे आणि परमपदप्राप्तीला ( मोक्षाला) जे वैराग्याचे बळ

लागते तेही हेच . ).

विठ्ठल हेच खरे धन आहे असे मानणारा वारकरी संप्रदाय, वैराग्याची महती सांगणारे वैदिक दर्शन, भक्तिमार्गात सांगितले गेलेले परोपकार, हे सगळे काही वेगळेच सांगत असताना कोणाला असे कसे वाटू शकते की कुटुंबाची काळजी घेता येईल इतका पैसा मिळवावा. आणि तुकाराम महाराज असे सांगत आहेत !

आणि हे सर्व त्यांनी स्पष्ट खालील अभंगात सांगितले असताना ? :

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥

 देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

 देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥

 निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ||

------------------------