रविवार, ४ डिसेंबर, २०१६

पैसा किती मिळवावा

पैसा किती मिळवावा ?

फेसबुकवर एका तरुणाची ह्या शीर्षकाची पोस्ट पाहून भरून आले. मूळ पोस्ट अशी :

“किती पैसा कमावला म्हणजे 

माणूस श्रीमंत समजावा?

याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे,

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, 

मुलाबाळांचे रक्षण करता यावे, 

आईवडिलांची काळजी घेता यावी.

अब्रूने जगता यावे, 

इतका पैसा जवळ असला 

की तो मनुष्य श्रीमंत समजावा...”

अगदी सामान्यांना वाटावे,पटावे असे हे विचार प्रथम दर्शनी किती सालस वाटतात. पण खरेच तुकाराम महाराज असे म्हणाले होते ? आणि कुठे ? ह्याचा शोध घेताना एका मुलाने प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताचा अर्थ कसा लावला त्याची आठवण आली. ( त्याला विचारले होते, “तमसो मा ज्योतिर्गमय ”चा अर्थ काय ? व त्याने त्याचा अर्थ केला होता, “तुम सो जाव मा, मै ज्योती के घर जा रहा हूं !” ). असेच काहीसे तर झाले नाही ना इथे ?

वरची पोस्ट लिहिणारा मुलगा अगदी तरुण असून अजून त्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला नसावा. कारण गृहस्थाश्रमाचे फळ सांगताना तुकाराम महाराज म्हणतात :

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥

उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥

परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥2॥

भूतदया गाई पशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥3॥

शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट  । वाढवी महत्व  वडिलांचें ॥4॥

तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥

( अर्थ : अहो जन हो, तुम्ही चांगला व्यापार करून द्रव्य मिळवा आणि त्याचा खर्च उदासीन विचाराने करा. असा जो करील त्याला उत्तम गति मिळेल आणि चांगल्या मनुष्ययोनी मध्ये जन्म घेऊन उत्तम भोग भोगील. दुसऱ्यावर नेहमी उपकार करतो व दुसऱ्याची निंदा करण्याचे जाणत नाही आणि परस्त्रिया आपल्या आईबहिणीसारख्या सर्व काळ मानतो. सर्व भूतांचे ठिकाणी दया करून गाई वगैरे पशूंचे पालन करतो आणि तृषित लोकांना अरण्याचे ठिकाणी पाणी पिण्याकरिता आड, विहिरी यथाशक्ती निर्माण करतो. आपली वृत्ती शांत असून कोणाशी वाईटपणाने वागत नाही व आपल्याहून जे श्रेष्ठ आहेत त्यांची महती वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात, गृहस्थाश्रमाचे हेच मुख्य फळ आहे आणि परमपदप्राप्तीला ( मोक्षाला) जे वैराग्याचे बळ

लागते तेही हेच . ).

विठ्ठल हेच खरे धन आहे असे मानणारा वारकरी संप्रदाय, वैराग्याची महती सांगणारे वैदिक दर्शन, भक्तिमार्गात सांगितले गेलेले परोपकार, हे सगळे काही वेगळेच सांगत असताना कोणाला असे कसे वाटू शकते की कुटुंबाची काळजी घेता येईल इतका पैसा मिळवावा. आणि तुकाराम महाराज असे सांगत आहेत !

आणि हे सर्व त्यांनी स्पष्ट खालील अभंगात सांगितले असताना ? :

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥

 देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

 देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥

 निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ||

------------------------

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

तुकारामाची नोटबंदी
तुकारामाच्या काळात नोटा होत्या का ? तसे म्हणतात की नोटांचा शोध चीन मध्ये हान वंशात ख्रिस्तपूर्व ११३ सालीच लागलेला होता व त्या नोटा चामड्याच्या केलेल्या असत. नंतर त्या कागदाच्या व्हायला इ.स.१६०० उगवावे लागले. बँकनोट म्हणजे एक प्रकारचा कायदेशीर कागद असतो ज्यात काही मौल्यवान देण्याचा करार केलेला असतो. I promise to pay the bearer a sum of two thousand rupees असे उर्जित पटेल हे रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर नव्या दोन हजाराच्या नोटेवर लिहून देतात. तसेच काही कायदेशीर कागद असतील तुकारामाच्या काळात. अमेरिकेत तर त्यांच्या नोटांना ते बिल म्हणतात. तसे तुकारामाच्या काळात “हुंडी” नक्कीच असणार कारण तसा उल्लेख आहे : ( पहा :
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥
 भरियेली हुंडी नरसी मेहत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
 मिराबाइसाठी पी जो विषाचा प्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥2॥
 कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥
 आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळा ॥4॥)
नरसी मेहता हे गुजरातीतले आदी संत कवी व कृष्ण भक्त. महात्माजींचे प्रसिद्ध भजन, “वैष्णव जन तो तेणे रे कहिये...” ह्या भजनाचे कवी, व त्यांना हुंडी मार्फत असलेले कर्ज कसे देवाने भरले त्याची ही कथा आहे. मी १९६७ मध्ये जेव्हा मुकंद कंपनीत होतो तेव्हा जेव्हा जेव्हा एखाद्या कंपनीला अॅडव्हांस द्यायचा असे तेव्हा आम्ही तो हुंडीच्या समोर देत असू. हुंडीचा कागद असा असे :
1951_Bombay_Province_Rs_2500_Hundi (1).jpg

राजाचा शिक्का असला की एखाद्या हलक्या वस्तूला सुद्धा कशी किंमत येते, असे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा चामड्यावर राजाचा शिका मारून त्याच्या नोटासारखा उपयोग होत असेल असे अनुमान काढता येते. तो अभंग असा :
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥1॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
वाहिले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षिलें ॥3॥
राजाने कातड्याचे पैसे केले तरी ते चालतात. असे सांगणारा हा अभंग इतका ताजा, इतका समकालीन आहे की नव्या पाचशेच्या नोटात काही नोटात महात्मा गांधीच्या चेहऱ्याभोवती एक पांढरा शेड चुकून आला तरी तो सरकारने स्वीकारला म्हणून आजही चालतो आहे, हे आपण पाहतोच आहोत. तर तुकारामाला नोटांची किती माहिती होती हे इथे कळते.
मोदींनी जशा नोटा बाद केल्या व त्या जुन्या नोटांची किंमत शून्य झाली तसे पैशाचे अवमूल्यन तुकारामाच्या वेळीही झालेले असावे. कारण एके ठिकाणी तुकाराम महाराज देवाचा सुद्धा भाव कमी झाला आहे व मंदी आली आहे तेव्हा तुम्ही तो फुकट घ्या. तुकारामाने तो उधारीत कर्जावू घेतला आहे, असे एका प्रसिद्ध अभंगात असे म्हणतात :
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥
देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥
मराठी पोरांना लहानपणापासून “पैसा झाला खोटा” हे ये रे ये रे पावसा तून शिकायला मिळते व त्यामुळे अध्यात्मात वा प्रत्यक्ष व्यवहारात पैसा खोटा होतो, होऊ शकतो हे आपल्याला सहजी समजू शकते व असेच तुकाराम महाराज एका गंमतीच्या अभंगातून आपल्याला दुकान केला मोठा पण पदरी खोटा रुपया आला कसा ते असे सांगतात :
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥ घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥ घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥ दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥

---------------------------








---------------------------

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

मी चोर तू पोलीस

चोर पोलीस खेळू ! मी चोर तू पोलीस !

-----------------------------------

आमच्या लहानपणीचा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता चोर पोलीस. ह्यात कोणालाही पोलीस व्हायला आवडायचे नाही. प्रत्येकाला चोरच व्हायचे असायचे. अगदी नाईलाजाने ज्याच्यावर राज्य येई त्याला पोलीस व्हावे लागे.

चोराला लपून बसायला मिळे, पळून जायला मिळे, तर पोलिसाला एकेकाला पकडावे लागे.

व्यवहारात सुद्धा चोर हे नेहमी पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतात. चोर हुशार असतात.

जे पदार्थ तब्येतीला वाईट असतात नेमके तेच चवीला छान असतात. आपल्याला वाईटच आवडते. अळणी नको असते.तुकाराम महाराज हेच सांगताना म्हणतात की चांगले सुगंध सोडून माशी पहा कशी दुर्गंधीपाशी जाते : राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुर्गंधीशीं अतिआदरें॥3॥तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥

ह्या सगळ्याच्या मुळाशी म्हणे माणसाचे रॅशनल नसणे आहे. आपण म्हणे ईरॅशनल बुद्धीचे असतो. आपली ठेवणच तशी आहे म्हणे ! अनेक लोकांच्या अथक प्रयत्नांनी आपण रॅशनल होतो ( ते ही झालो तर...!).

---------------------

-------------

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

कारणा कारण

कारणा कारण
विज्ञानाच्या अभ्यासामुळे आपला असा समज होतो की जे काही आपल्या अवती भवती घडते आहे त्याला काही ना काही कारण असतेच. सगळ्याच ज्ञानशाखांचा रोख हे कारण शोधण्याकडे असतो.
आग, पाणी, तेज, वायू, आकाश, ही आदिम पंचमहाभूते घेतली तरी विज्ञान म्हणते की ती काही स्वयंभू अशी असत नाहीत. काही तरी कारण घडते आणि ही पंचमहाभूते प्रकटतात. सगळे जगच जर पंचमहाभूतांचे बनलेले असेल तर मग जगात विनाकारण असे काही नाहीच म्हणायचे !
आपण माणसे ह्या जगात अगदी एकमेवाद्वितीय आहोत असा भ्रम जरी खरा मानला तरी आपल्यावरही कोणा कोणाचा प्रभाव पडतच असतो असे कोणतेही प्राथमिक मानसशास्त्र आपल्याला सांगून जाते.
एकूण काय कुठलेही निरिक्षण, कुठलाही विचार, कुठलेही प्रमेय, कुठलाही वाद, काहीही घेतले तरी ह्या कार्य-कारणातून आपल्या समजाची काही सुटका दिसत नाही. आणि हे वैज्ञानिक कार्यकारण शोधणे इतके धोक्याचे असते की इथे किती टक्क्याचे कारण हे खरे कारण असा काही ठोकताळा नाही. अगदी नोबेल पारितोषिक मिळालेल्या ग्रॅंगर-कॉज च्या समीकरणातही किती टक्क्याचे प्रमाण म्हणजे खरे कारण असे काही सापडत नाही. म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आटापिटा हा असा मोघमच !
ह्या गदारोळातून तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गाचा उपाय सुचविला आहे. ते म्हणतात : ( २८७१, जोग प्रत,) : कारणा कारण ( कार्यकारण ) वरियेले जेथे । जातों तेणे पंथे सादावित ॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरवंसेनी ॥ ( जोग प्रतीतला अर्थ : ज्या ठिकाणी कार्यकारण नाहींसे होते ( शेतात बी पेरले असतां धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारण भाव प्रवृत्तीमध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सारली आहे त्या निवृत्तीच्या ) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही ह्याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल.
-------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

शंका फिटणे

शंका फिटणे

--------------------

संत श्री ज्ञानेश्वरांची एक विराणी ( विरहिणी ) :

माझी शंका फिटले |  लाजा सांडिले | आवघे घातले |

मज निरसुनिया ||१||  अठरा भार वनस्पती | सुरवर वोळंगती || देवोदेवि आदिपती | कृष्ण काळा गे माये ||२||ऐसा कृपानिधी सांवळा| कीं बापरखुमादेवीवरु गोंवळा || त्याचा मज चाळा | बहु काळ गे माये ||३||

माझी शंका फिटली, माझी लाज लुप्त झाली, आणि मला सर्व काही अगदी निवडून निरसून दिल्यासारखे दिल्या गेले आहे. हे सुरवर धारण करीत आहेत अठरा भार वनस्पती. तसेच ती धारण करीत आहेत देवोदेवी, आदिपती, व कृष्ण जो काळा आहे. ही कृपा करणारा सांवळा असा आहे की विठ्ठलही त्यात गोवला गेला आहे. त्या कृष्णाचा मला चाळा लागला आहे व तो खूप काळापासून.

ही कृष्णाची हुरहूर आहे तशीच ती अठरा भार वनस्पतीचीही हुरहूर आहे. काय असेल अठरा भार ? भार व धारण करणे ह्यावरून “अठरा भार” हे वनस्पतीचे खूप असण्याचे मोजमाप असावे. जगात वनस्पती किती, जलचर किती, पशू किती, किडे किती, माणसे किती हे मोजण्याचे शास्त्र आहे टॅक्सॉनॉमी नावाचे. ह्यात एक २० मैल बाय २० मैल आकाराचे क्षेत्र घेवून त्यातले स्पीसीज मोजतात. हे मोजणे कैक लक्ष डॉलर खर्चून अजून चालूच आहे.

ज्ञानेश्वरानंतर झालेल्या तुकारामाने त्याला ज्ञात असलेले हे आकडे एका अभंगात असे दिलेत (८४ लक्ष योनी )  : वीस लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या | जलचरी भोगाव्या नव लक्ष || अकरा लक्ष योनी किड्यामाजी घ्याव्या | दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये || तीस लक्ष योनी पशूंचिये घरीं | मानवाभीतरी चार लक्ष || एकएक योनी कोटी कोटी फेरा | मनुष्यदेहवारा मग लागे || तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा | तयाचा मातेरा केला मूढें ||

तुकारामाच्या काळात २० लक्ष योनी असलेल्या वनस्पती कदाचीत ज्ञानेश्वरांच्या काळात १८ लक्ष असतील तर मग “अठरा भार” हे वनस्पतीचे त्या काळातले मोजमाप असावे.

---------------------

शंका फिटणे
--------------------
संत श्री ज्ञानेश्वरांची एक विराणी ( विरहिणी ) :
माझी शंका फिटले |  लाजा सांडिले | आवघे घातले |
मज निरसुनिया ||१||  अठरा भार वनस्पती | सुरवर वोळंगती || देवोदेवि आदिपती | कृष्ण काळा गे माये ||२||ऐसा कृपानिधी सांवळा| कीं बापरखुमादेवीवरु गोंवळा || त्याचा मज चाळा | बहु काळ गे माये ||३||
माझी शंका फिटली, माझी लाज लुप्त झाली, आणि मला सर्व काही अगदी निवडून निरसून दिल्यासारखे दिल्या गेले आहे. हे सुरवर धारण करीत आहेत अठरा भार वनस्पती. तसेच ती धारण करीत आहेत देवोदेवी, आदिपती, व कृष्ण जो काळा आहे. ही कृपा करणारा सांवळा असा आहे की विठ्ठलही त्यात गोवला गेला आहे. त्या कृष्णाचा मला चाळा लागला आहे व तो खूप काळापासून.
ही कृष्णाची हुरहूर आहे तशीच ती अठरा भार वनस्पतीचीही हुरहूर आहे. काय असेल अठरा भार ? भार व धारण करणे ह्यावरून “अठरा भार” हे वनस्पतीचे खूप असण्याचे मोजमाप असावे. जगात वनस्पती किती, जलचर किती, पशू किती, किडे किती, माणसे किती हे मोजण्याचे शास्त्र आहे ॅक्सॉनॉमी नावाचे. ह्यात एक २० मैल बाय २० मैल आकाराचे क्षेत्र घेवून त्यातले स्पीसीज मोजतात. हे मोजणे कैक लक्ष डॉलर खर्चून अजून चालूच आहे.
ज्ञानेश्वरानंतर झालेल्या तुकारामाने त्याला ज्ञात असलेले हे आकडे एका अभंगात असे दिलेत (८४ लक्ष योनी )  : वीस लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या | जलचरी भोगाव्या नव लक्ष || अकरा लक्ष योनी किड्यामाजी घ्याव्या | दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये || तीस लक्ष योनी पशूंचिये घरीं | मानवाभीतरी चार लक्ष || एकएक योनी कोटी कोटी फेरा | मनुष्यदेहवारा मग लागे || तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा | तयाचा मातेरा केला मूढें ||
तुकारामाच्या काळात २० लक्ष योनी असलेल्या वनस्पती कदाचीत ज्ञानेश्वरांच्या काळात १८ लक्ष असतील तर मग “अठरा भार” हे वनस्पतीचे त्या काळातले मोजमाप असावे.
---------------------



सोमवार, ११ एप्रिल, २०१६

कार्यकारण

कार्यकारण
कारणा कारण (कार्यकारण) वरियेले जेथें । जातों तेणें पंथें सादावित ||
 संतीं हें पईल  लाविलें निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥
 तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरंवसेनी ||
( ज्या ठिकाणी कार्यकारण नाहीसे होते ( शेतात बी पेरले असता धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारणभाव प्रवृत्ती मध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सरली आहे त्या निवृत्तीच्या) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल .)
काय केले असता काय होते हे निश्चित सांगणारे जे विज्ञान आहे त्यात सर्वात प्रगत विज्ञान आहे क्वांटम मेकॅनिकस्. आणि त्यात आपल्याला आध्यात्मिक गोष्टी आढळतात. जसे गॉड पार्टीकल, नेमके काही मोजता न येणे, मॅटर तसेच अॅंटी मॅटर, स्थान नक्की असेल तर वेग नक्की नसतो, अनेक विश्वे असणे, वगैरे. विज्ञानात निश्चितता (  Determinism ) असल्याचा आपला समज अशाने डळमळतो. वैद्यक शास्त्रात तर कालची ठाम मते आज बाद झाली आहेत . जसे : ( भाजले तर पाणी लावू नये वगैरे ). आजकाल तर निश्चितता हवीच कशाला असे मत पुढे येऊ लागले आहे.
अशा वेळेस शनीची अवकृपा झाल्याने बलात्कार वाढतील हे वैज्ञानिक मानले तर ते क्वांटम शास्त्राने अनेक विश्वात खरे ठरू शकते. ह्यावर तुकाराम महाराजांचा सल्ला पटावा. ते म्हणतात कार्यकारणभाव हा प्रवृत्तीत असतो, निवृत्तीत नसतो. निवृत्तीत भरवसा असतो. मग पांडुरंग भेटतो. शेतकरी आत्महत्या का करतात, बलात्कार का वाढतात वगैरे चौकशी-प्रांत हेच मुळी आता भरवशाचे प्रांत झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कार्यकारण लागू न करता लोक आपापले भरवसे देत आहेत !

-----------------------------------