तुकाराम टाइम्स
-------------
तुकाराम महाराजांचा आजचा
आग्रह लेख : ५६
----------------
तुकाराम महाराज आज
एखाद्या वर्तमानपत्राचे सम्पादक असते तर सम्पादक जसे अग्रलेख लिहून महत्वाच्या
बातमीवर टिप्पणी करतात तसे आजच्या बातमीवर काय म्हणाले असते ?
आजची बातमी: ( ५६ )---- मुम्बई
तापाने फणफणली ! डेंग्यूची साथ!
-------------
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात
॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण
॥2॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची
॥3॥
------------
तसा डेंग्यू हा तापाचा प्रकार सध्याचा पण तुकरामाच्या
काळातही हा ताप असणारच. त्यावर मग तुकाराम महाराज काय म्हणाले असतील ? ज्यांना
डेंग्यू होतो त्यांना माहितच असेल की हा ताप आल्यावर काही गोड लागत नाही. तेच
तुकाराम महाराज इथे म्हणत आहेत की त्याला दूध गोड न लागता विषासारखे लागते. हे
म्हणजे ज्याला कावीळ झाली आहे त्याला चन्द्रही पिवळा दिसतो तसे आहे. किंवा
दारुड्यांना लोण्याची चव नसते तसे आहे !
--------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा