शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८


दिवाळी दसरा !
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥
तुका म्हणे  आले घरा । तो चि दिवाळी दसरा ॥3॥
-------------------
दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥1॥
आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥
धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥2॥
तुका म्हणे  काय होऊं उतराई  । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥3॥


तिथी वारा प्रमाणे आलीय म्हणून दिवाळी साजरी करणे हे रीतीप्रमाणे योग्यच. पण जेव्हा घरी संत जन येतील किंवा आलेल्या लोकात आपल्याला संतपणा पाहता येईल तेव्हा ती खरी दिवाळी असे तुकाराम महाराज म्हणतात ते काही खोटे नाही !
तर अशी दिवाळी तुम्हा आम्हाला साजरी करता येवो !
------------------