तुक्याची ग्वाही-११
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
पण हित म्हणजे काय? आणि स्वहित हे आधीच्या अभंगातून आपण अध्याहृत धरू शकतो. एक संस्कृत श्लोक मला आठवतो.
उत्तर द्याहटवाश्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चाप्यवधार्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्।।
यद्यदात्मनि चेच्छेत तत्परस्यापि चिन्तयेत्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्।।
कोण्या पुराणातला आहे/असेल. पण लईच simplistic किंवा simpleton आहे!
स्वहित हे जीवांमध्ये असतेच असे म्हणता येईल. पण प्रत्येकाने स्वहित पाहात राहिले तर संघर्ष ओढावणे सहज शक्य आहे. म्हणजे व्यक्ति-हित आणि समाज-हित याची काही स्पष्ट व्यवस्था अभंगांमधून दिसते का? अर्थात तुकोबा काही सोशल थिअरी मांडत नाहीयेत. पण एकुणात हिताचा तात्त्विक विचार असा दिसतो का?
उत्तर द्याहटवास्वहित व समाजहित
उत्तर द्याहटवासमाजहिताचा विचार तुकारामांनी कसा केला होता ? ह्यावर पसायदानातला विचार हाच विचार म्हणता येईल. ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाचा पाया घातला तर साहजिकच तुकारामांनी जो जे वांछिल ते तो लाहो, असे व्यक्तीसाठी तर समाजासाठी म्हणावे की "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". समाजजीवनात सर्व सुरळीत चालायचे तर प्रत्येकाचे व्यक्तिगत आचरण चांगले व्हावे हा अगदी बाळबोध मार्ग राहतो. मग तुकाराम सांगतात, थोडी विरक्तीच व्यक्तीला बरी. "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी". मायक्रोसॉफ्टला फेअर प्रक्टीसेस ने म्हणजेच "उत्तम वेव्हारे" धन जोडावे लागते. जर काही ठीकाणी ते कोंडी करीत असतील तर मोनॉपली खाली त्यांच्यावर मुक्त अर्थव्यवस्थेत खटले होतात. शिवाय हे मेळविलेले धन बिल गेटस, उदास विचारेच वेच करतो आहे. स्वत: साठी अगदी मोजकेच ठेवून बाकी जनकल्याणासाठीच खर्चतो आहे. तुका म्हणे द्रव्य मेळविले मागे । हे तो कोणासंगे आले नाही ॥ हे सत्यमचा राजू अगदी खरे खरे म्हणेल, इतर जरा विलंबाने कबूलतील. समाजहिताची सुंदर सोपी कल्पना तुकारामांची अशी की प्रत्येक व्यक्तीनेच "निर्वैर व्हावें सर्व भूतांसवे । साधन बरवे हेंचि एक ॥" आणि हे आजही सामाजिक न्यायासाठी आपण पाळीतच आहोत.जसे अयोध्या निकाल, मुसलमानांना शिष्यवृत्त्या, मदत वगैरे. तुकारामातला कवी तर दाणे टिपणार पक्षी त्याला भिऊन उडतात तेव्हा तर त्याला वाटते "अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कैं होती ॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ माझी कोणी न धरो शंका । विश्व हो का निर्द्वंद्व ॥" दिसायला सोपे दिसते पण एकमेकांबद्दलचा विश्वास हीच तर आजच्या समाजस्वास्थ्याची गोम आहे.
स्वहित व समाजहित
उत्तर द्याहटवासमाजहिताचा विचार तुकारामांनी कसा केला होता ? ह्यावर पसायदानातला विचार हाच विचार म्हणता येईल. ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाचा पाया घातला तर साहजिकच तुकारामांनी जो जे वांछिल ते तो लाहो, असे व्यक्तीसाठी तर समाजासाठी म्हणावे की "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". समाजजीवनात सर्व सुरळीत चालायचे तर प्रत्येकाचे व्यक्तिगत आचरण चांगले व्हावे हा अगदी बाळबोध मार्ग राहतो. मग तुकाराम सांगतात, थोडी विरक्तीच व्यक्तीला बरी. "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी". मायक्रोसॉफ्टला फेअर प्रक्टीसेस ने म्हणजेच "उत्तम वेव्हारे" धन जोडावे लागते. जर काही ठीकाणी ते कोंडी करीत असतील तर मोनॉपली खाली त्यांच्यावर मुक्त अर्थव्यवस्थेत खटले होतात. शिवाय हे मेळविलेले धन बिल गेटस, उदास विचारेच वेच करतो आहे. स्वत: साठी अगदी मोजकेच
ठेवून बाकी जनकल्याणासाठीच खर्चतो आहे. तुका म्हणे द्रव्य मेळविले मागे । हे तो कोणासंगे आले नाही ॥ हे सत्यमचा राजू अगदी खरे खरे म्हणेल, इतर जरा विलंबाने कबूलतील. समाजहिताची सुंदर सोपी कल्पना तुकारामांची अशी की प्रत्येक व्यक्तीनेच "निर्वैर व्हावें सर्व भूतांसवे । साधन बरवे हेंचि एक ॥" आणि हे आजही सामाजिक न्यायासाठी आपण पाळीतच आहोत.जसे अयोध्या निकाल, मुसलमानांना शिष्यवृत्त्या, मदत वगैरे. तुकारामातला कवी तर दाणे टिपणार पक्षी त्याला भिऊन उडतात तेव्हा तर त्याला वाटते "अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कैं होती ॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ॥ माझी कोणी न धरो शंका । विश्व हो का निर्द्वंद्व ॥" दिसायला सोपे दिसते पण एकमेकांबद्दलचा विश्वास हीच तर आजच्या समाजस्वास्थ्याची गोम आहे.
उत्तर द्याहटवा