रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

तुकाराम टाइम्स 
------------------------ 
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १५ 
---------------- 
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१५ ------- शबरीमला देवस्थानात जाण्यास स्त्रियांना हक्क असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा !
--------------
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥2॥
तुका ह्मणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥3॥
---------------------
आपल्याला वाटते की तुकाराम महाराजांच्या काळात तर स्त्रियांना हमखासच परवानगी नसणार व तसे त्या काळातले विचारही मागासलेले असणार. पण वरचा अभंग पहा. इथे नुसतीच परवानगी नाही तर “ ज्या स्त्रियांना हरि आवडतो त्या आम्हाला विठोबासमान आहेत व त्यांना आम्ही नमतो. ज्यांचे अंतर निर्मळ आहे त्याचे बाह्य शरीर सुद्धा शुद्ध आहे असे मानावे. मी माझा देह त्यांच्यावरून ओवाळून टाकीन !”
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा