रविवार, ३० सप्टेंबर, २०१८


स्वैरिणी / सौर्या
-----------------------
स्त्री आणि पुरुष ही सगळ्या जगात मान्य असलेली लिंगे आहेत किंवा ह्या दोन रूपात वावरणारे सगळ्यात ज्यास्त असलेले लोक आहेत. पण आजकाल प्रस्थ आहे ते LGBT ( Lesbians, Gays, Bisexuals, Transgenders ) ( समलिंगी सम्भोग करणार्या स्त्रिया, समलिंगी सम्भोग करणारे पुरुष, कधी समलिंगी तर कधी परलिंगी सम्भोग करणारे, व हिजड़े   ). आजकाल अशा लोकांना असे वागण्याची कायदेशीर मुभा मिळालेली आहे. पण असे लोक सन्खेने कमी असल्याने त्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती असते. आणि खरेच असे लोक असतात का असे कुतूहल असते.
पण अशा प्रवृत्ति अनेक पिढ्यांपासून चालत आल्या आहेत. त्यासंबंधी तुकाराम महाराजांच्या गाथेत शोध घेतला असता त्यांनी फक्त ट्रान्सजेंडर्सना हिजडे असा आजकाल प्रचलित असलेला शब्द वापरलेला आहे. इतर प्रकारासाठी ते स्वैरिणी असा शब्द वापरतात आणि त्यावर त्यांनी अकरा अभंग रचलेले आहेत, जे खाली दिलेले आहेत.
व्यवहारात आपण स्त्री किंवा पुरुष हे “पाहून”, बाह्य वेषावरूनच ताडत असतो. जिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे लोक बाह्य वेष धारण करीत असतात. पण बहुतेक एलजीबीटी हे स्त्री-वेषच धारण करणारे असतात. ह्यावर तुकाराम महाराज म्हणतात, “जन वेषा भीतें”. खरे लिंग कोणतेही असले तरी बाह्य वेष बाईचा कसा असतो त्यासंबंधी ते म्हणतात, “बाहिरल्या वेषें आंत जसें तसें ”. अजून एके ठिकाणी ते म्हणतात, “फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी”. आपण जो वेष घालत असतो तो लहानपणी पालकांनी निवडलेला असतो, व मोठेपणी समाज ठरवत जातो. हेच तुकाराम महाराज असे सांगतात, “तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें”. समजा कोणी स्त्री ही लहानपणी मुलगी म्हणून वाढवलेली असेल व नंतर बेडरूममध्ये “पुरुष” म्हणून वागत असेल तरीही तिचा इतरवेळचा वेष हा जास्तकरून स्त्रीचाच असतो. लहानपणी मुलगा म्हणून वाढवलेले पण नंतर स्त्री म्हणून वावरू पाहणारे लोक हे अर्थातच स्त्री-वेष धारण करू पाहतात. पण समाजात जर अशा प्रवृत्तीला मुभा असेल तर मात्र इतर वेळी पुरुष-वेष धारण करूनही ते बेडरूममध्ये बाई म्हणून वावरू शकतात. पूर्वी हे एव्हढे मान्य नसल्याने पूर्वी ज्या मुलग्यान्ना मुलगी म्हणून वागायचे असायचे ते अर्थातच मुलींचा वेष घालीत. जिथे समलिंगी पुरुषांना अगदी लग्नाची मुभा आहे तिथे ते एरव्हीच्या वावरण्यात पुरुष वेष परिधान करतात असे आपण बघतो. काहींना वाटेल की वेष कोणता हे अगदी वरवरचे आहे आणि त्याला इतके महत्व का द्यावे ? पण आजही अनेक घटस्फोट अशा कारणावरून होतात. जसे मुलगा रात्री मुलींचे कपड़े घालतो हे न पटल्याने मुली विभक्त होतात.
स्त्री-वेष परिधान करण्यामागे अर्थातच लक्ष वेधून घेणे हा हेतू असतो. ह्यावर तुकाराम महाराज म्हणतात, “नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ||”. अमेरिकेत जे पुरुष गे म्हणजे समलिंगी सम्भोग करणारे असतात ते बहुतेक करून फुलाफुलांचे वा नक्षीकामाचे कपडे घालतात. त्यातही लक्ष वेधणे हाच हेतू असतो.
लक्ष वेधून घेण्याचा अजून एक प्रकार म्हणजे नाच किंवा नृत्य करणे. दहा वीस वर्षापूर्वी हिजड़े हे हमखास जन्म, वा लग्न दिनी नाच करण्यासाठी घरोघर हिंडत हे आपण पाहिलेले आहे. हे नाच करणे, तुकाराम महाराज असे नोंदवतात: “आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण”; “आतां येणें छंदें नाचों विनोदें”; “दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा”; “अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई”; “लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं”; “थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥”.
खरे तर बहुतेक माणसे रूढी पाळणारे असतात. बंडखोरी करणे हे तसे धाडसाचे काम. पण जनरीती विरुद्ध ज्या लैंगिक प्रवृत्ति असतात त्यांचा पगडा इतका प्रभावी असतो की अशा प्रवृत्तिची माणसे परम्परांची चाड बाळगीत नाहीत. तुकाराम महाराज हे असे सांगतात: “तोंडा आमुच्या भांडपणा”; “टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें”; “सकळांमधीं आगळी बुद्धि”; “टाक रुका नाचों निर्लज्जा”; “लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं”; “लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही”; “निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों”.
नॉर्मल लोक लैंगिक वागणुकीत टोकाचे वागत नाहीत, पण एलजीबीटी लोक टोकाची लैंगिक वर्तणुक करतात असे निरिक्षण तुकाराम महाराज असे करतात: “दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे”; “कोणासवें लाज कोण दुजा पाहता”; “रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी”.
स्वैरिणी वृत्तीचे वर्णन करणारे तुकाराम महाराजांचे अकरा अभंग असे आहेत :
सौर्या - अभंग ११
४५५
वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥
जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥
वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥
म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥

४५६
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥
४५७
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥
कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥
याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
४५८
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥
ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥
न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥
देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥
४५९
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥
या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥
तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥
४६०
सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥
हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥
लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥
जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥
तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
४६१
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥
गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥
ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥
४६२
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥
चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥
बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥
४६३
नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥
ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥
चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥
थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥
आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥
४६४
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥
घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥
दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी ।
तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥
४६५
जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।
माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका ।
नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥
खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्याे । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्या ॥३॥
वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥
कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥
संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥
॥११॥
-----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा