ई-तुका: १४
तुकाराम महाराजांचा टग्या विनोद
एखाद्याचे पाईल्सचे ऑपरेशन झालेले असेल तर बिचार्याला बसताना खूपच यातना होतात. मग काही काळ डॉक्टर म्हणतात, बसताना स्कूटरची टयूब फुलवून त्यावर बसा. मग असे लोक बरोबर पिशवीत टयूब घेऊनच हिंडतात. आणि त्यांच्या चेहर्यावर भाव असतो, पंक्चर झाल्यासारखा. अशांवर टगे लोक विनोद करतात कि काय आजकाल पाईल-फौंडेशनवर का ? त्याचे व्यंगचित्रही काढतात. हा जरा दुष्ट विनोद खरा पण विनोदाचा एक प्रकार म्हणून प्रचलित आहे.
तुकाराम महाराजांच्या काळातही हे होत असावे. कारण एके ठिकाणी ते म्हणतात :
तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचे दु:ख गांड फाडी ॥
पाईल्सचे दु:ख किती अपार ते ज्याचे त्यालाच माहीत असते. मग अशा वेळी देखीचा दिमाख ढासळून पडतो. असे वर्णन तुकाराम महाराज इथे करीत आहेत.
अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा