तुक्याची ग्वाही-५
"आपुलाले हित आपण पाही । संकोच तो न धरी काही ॥ "(३१,जोग प्रत)
सामान्य माणसाला व्यवहारात कसे वागावे ही शिकवण तुकाराम महाराज फार छान देतात. एक माणूस तेल-घाणी चालविणार्या तेलणीशी रुसला व तिच्याकडून तेल कसे आणायचे ह्या संकोचापायी कोरडेच खाऊ लागला. आता तिच्याशी भांडण झालेय म्हणून बिना तेल कोरडेच खाणे ह्यात आपले काहीच हित नाही. तसेच एक बाई दुसर्याला अपशकून करण्यासाठी स्वत:चे डोके भादरून घेते ह्या रागात तिचे काय हित आहे बरे? एका माणसाने घरात पिसवा खूप झाल्या म्हणून घरालाच आग लावून दिली. ह्यात त्याचे घर जळाले, दुसरे काही हित झाले काय ? एका स्त्रीने लुगड्यात खूप उवा झाल्या म्हणून लुगडेच फेडले तर त्यात तिचीच फजीती आहे. ह्या सर्व व्यवहारातल्या प्रसंगी राग व भावनेच्या आहारी जावून व कसलाही संकोच बाळगून माणसाचे हित होत नाही अशी शिकवण इथे तुकाराम महाराज फार खुबीने देत आहेत.
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
तुमच्या ब्लॉग टायटल वर मी बेहद्द खूष झालो.. ई-तुका..सही...
उत्तर द्याहटवा