तुक्याची ग्वाही-६
"तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥" ( ७६,जोत प्रत)
तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी होते म्हणून त्यांनी व्यापाराचे उदाहरण द्यावे, हे खूपच साहजिक आहे. व्यापारात कसा माणूस नुकसान होत असेल, तर साहजिकच थोडया वेळाने तो धंदाच बदलतो, बंद करतो. तसेच इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत की जिथे आपले हित होत नसेल ते प्रयत्न , ते काम, माणसाने सोडून द्यावेत. उगाच नुकसान करणार्या व्यापात माणसाने आपले आयुष्य खर्ची घालू नये. चित्त शुद्ध करावे, देवाचे चिंतन करावे, व असे आपले स्वहित पहावे.व्यापार करण्याच्या ह्या उपदेशात थोडे उदारीकरण करून असे जर पाहिले की असा धंदा करावा की ज्यात सगळ्यांचेच हित होईल, तर तो एक अप्रतीम असा सल्ला होईल.लोकांना चार घास मिळावेत म्हणून शेतकर्यांनी शेती करावी, तोच भाव मनी ठेवून वाणी लोकांनी त्याचा व्यापार करावा,खाणार्याचे आरोग्य चांगले राहील ह्या हिताच्या दृष्टीने खाण्याचे पदार्थ करणार्यांनी काळजी घ्यावी, असा सर्वंकश हिताचा विचार केल्यानेच "हिताचा व्यापार" होईल.
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
हॉट डॉग विकण्याचा व्यवसाय कसा राहील?
उत्तर द्याहटवाकुत्र्याने हाडुक जसे चघळावे तसे माणसाने व्यापाराचा विचार घोळवावा,
उत्तर द्याहटवाहे हिताचेच आहे. ही जपानी गोष्ट आहे: हिताची !