बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 7

तुक्याची ग्वाही-७
"तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥" ( १४४६,जोत प्रत)
तुकाराम महाराज हिताचा, स्वहिताचा विचार करा असा उपदेश देतात तेव्हा हित कशात पहावे त्याचाही फार मोलाचा विचार देतात. ते म्हणतात, ज्या विचारात नीतीचा विचार होतो त्यातच हित असते. नीती म्हणजे अगदी सोप्या शब्दात, चांगले काय व वाईट काय ह्याची जाण. आणि हे कसे ठरवायचे तर, आपल्या चित्ताला साक्षी ठेवून. ह्यासाठी ते अगदी रोचच्या व्यवहारातली उदाहरणे देतात. जसे, दळण दळण्या आधी आपण खडे निवडतो, नाही तर भाकरीत कचकच लागेल. इथे आळस करून काही उपयोग नाही. शेत कामात पीक चांगले यायचे असेल तर आजूबाजूचे तण उपटून काढावे लागतात. इथे आपण जसा हिताचा विचार करून, आळस न धरता, काय चांगले त्या नीतीचा विचार करतो व त्याप्रमाणे वागतो, त्यातच माणूस मात्रांचे हित आहे. जीवनाचे सूत्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येणे हे तुकाराम महाराजांचे खासे देखणे वैशिष्टय आहे.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

1 टिप्पणी:

  1. असंत लक्षण भूतांचा मत्सर | मनास निष्ठुर अतिवादी ||१||
    अंतरीचा रंग उमटे बाहेरी | वोळखियापरी आपेआप ||धृ ||
    संत ते समय वोळखती वेळ | चतुष्ट निर्मळ चित्त सदा ||२||
    तुका म्हणे हित उचित अनुचित | मज लागे नित आचरावे ||3||

    उत्तर द्याहटवा