भाषाशास्त्रात असे म्हणतात की आपण जे शब्द तयार करतो त्याने आपण केवळ भेद दाखवत असतो. म्हणजे जेव्हा आपण "गोड" हा शब्द योजतो तेव्हा तो "तिखट" ह्या शब्दापासून कसा वेगळा आहे हेच आपण दाखवत असतो. असे भेद दाखवणारे व विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपण एकत्र केले तर असे दिसते की विरुद्ध अर्थाचे शब्द हे नेहमी ( ७० टक्के ) त्या अर्थाच्या एका शब्दाला यमक योजून केलेले असते. उदाहरणार्थ आपण काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोडया प्रथम पाहू. त्या अशा आढळतील : १) अधोगती-प्रगती २) अनाथ-सनाथ ३) अपेक्षित-अनपेक्षित ४) अब्रू-बेअब्रू ५) आघाडी-पिछाडी ६) आदर-अनादर ७) आवक-जावक ८) आशा-निराशा ९) आस्तिक-नास्तिक १०) इमान-बेइमान ११) इलाज-नाइलाज १२) इष्ट-अनिष्ट १३) इहलोक-परलोक १४) उत्तीर्ण-अनुत्तीर्ण १५) उन्नती-अवनती १६) उचित-अनुचित १७) उच्चा-नीच १८) उत्कर्ष-अपकर्ष १९) एकमत-दुमत २०) कडू-गोड २१) कृतज्ञ-कृतघ्न २२) कृपा-अवकृपा २३) खंडन-मंडन २४) चल-अचल २५) जहाल-मवाळ २६) तारक-मारक २७) दुष्ट-सुष्ट २८) नि:शस्त्र-सशस्त्र २९) प्रसरण-आकुंचन ३०) प्राचीन-अर्वाचीन ३१) पुरोगामी-प्रतिगामी ३२) भरती-ओहोटी ३३) माजी-आजी ३४) माहेर-सासर ३५) राजमार्ग-आडमार्ग ३६) वंद्य-निंद्य ३७) विधायक-विध्वंसक ३८) विसंवाद-सुसंवाद ३९) वैयक्तिक-सामूहिक ४०) शुद्धपक्ष-वद्यपक्ष ४१) सगुण-निर्गुण ४२) सजातीय-विजातीय ४३) समता-विषमता ४४) सावध-बेसावध ४५) स्वकीय-परकीय ४६) स्वार्थ-परमार्थ ४७) साधार-निराधार ४८) साक्षर-निरक्षर ४९) सुकाळ-दुष्काळ ५०) सुचिन्ह-दु:श्चिन्ह ५१) सुपीक-नापीक ५२) सुरस-नीरस ५३) सुलक्षणी-दुर्लक्षणी ५४) सुसंगत-विसंगत ५५) सुर-असुर ५६) सुज्ञ-अज्ञ ५७) सोय-गैरसोय ५८) स्वतंत्र-परतंत्र ५९) स्वदेशी-विदेशी ६०) स्वस्ताई-महागाई ६१) स्वस्थ-अस्वस्थ ६२) होकार-नकार ६३) ज्ञानी-अज्ञानी ६४) ज्ञात-अज्ञात ....वगैरे.आपण नेहमी जे विरुद्ध अर्थाचे शब्द करतो त्यांची तुम्ही जंत्री केलीत तर तुम्हाला हमखास आढळेल की बहुतेक जोड्या ह्या यमकानेच होतात. "ऍन ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या मार्जोरी बोल्टन ह्यांच्या ग्रंथात आपण पाहिलेच आहे की यमकाने दोन अक्षरांच्या साम्यामुळे एक प्रकारचा समीपपणा येतो. तसेच इथे आपण पहात आहोत की यमकामुळे विरुद्ध अर्थाची दोन टोके वाटतील असे शब्द तयार होतात. आता कवीकल्पनेत व अध्यात्मात अनेक वेळा दोन टोकांच्या कल्पना सांगाव्या लागतात. त्यामुले यमके वापरून शब्द केले तर ते किती सहजतेने जमते हे आपल्या संतांना माहीत होते असे दिसते. कारण तुकाराम महाराजांनी अशा दोन विरुद्ध टोकाच्या कल्पना सांगण्यासाठी यमके वापरली आहेत हे सोदाहरण दिसते. पहा : १) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ ( सुख व दु:ख ह्या विरोधी कल्पना व जवापाडे-पर्वताएवढे हे यमक) २) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ ३) मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥ ४) ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥ ५) तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥ ६) विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥.
शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११
बी-माहात्म्य
२) बी-महात्म्य
--------------------------------------------------------------
(३५४६)
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥1 ॥
मधील ते वाव अवघी उपाधि । तुह्मां आह्मांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥
घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥2 ॥
तुका ह्मणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥3॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
खरे तर हा प्रसिद्ध अभंग ब्रह्मतत्वाच्या अद्वैताचे निरूपण करणारा आहे, पण आपण त्यातून बी-बियाणाचे महात्म्य कसे दाखवलेले आहे त्याचा बोध घेऊ शकतो. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, ती वाफ ढग होऊन वर जाते, ती कालांतराने थंड होऊन, वाहून पाऊस पडतो, पावसाने नद्या वाहू लागतात, नद्या मग समुद्राला येऊन मिळतात असे जे चक्र आहे त्याचा दृष्टांत ज्ञानेश्वरापासून सर्व संतमंडळी ब्रह्मतत्वाचे अद्वैत सांगण्यासाठी करतात. आकाशाचेच गुण असलेल्या घट , माठ, ह्यांना आपण वेगवेगळी नावे देतो पण ते आकाश-तत्वाचेच दर्शन असते. त्या दृष्टांतात पुढे जाऊन तुकाराम महाराज दुसरा एक दाखला देतात की एका बी-पासून दुसरी बी तयार होते, आणि त्या दरम्यान जी पाने, फुले ही झाडाची अवस्था होते, ती एक प्रकारे महत्वाची नसून वाया जाणारीच आहे. बी च तेवढे खरी.
बीज-तत्वाचे सर्व जगात फार महत्व आहे. एखादा शास्त्रज्ञ आयुष्यभर अभ्यास करून काही शोधून काढतो व ते ज्ञान शेवटी बीज-स्वरूपात एखाद्या सूत्राने बद्ध करून दाखवतो. जसे आइनस्टाइनचे सर्व प्रयत्न एका सूत्रात ( E= m c २ ) दाखविले की त्याच्या सर्व शोधाचे सार एखाद्या बी सारखे हे सूत्र दाखवते जे पिढ्यान पिढ्या जपले जाते. गव्हाचे ताट काही महिनेच टिकेल पण गव्हाचे बी म्हणून कित्येक शतके टिकू शकते. इजिप्तच्या हजारो वर्षांपूर्वीच्या ममीज भोवती जे धान्य बी म्हणून आढळते ते परत पेरले असता ते धान्य उगवते. एखाद्याला भाराभर सांगतांना ते टिकवायचे असेल तर ते बीजरूपाने सांगितले तर त्याचा टिकाव व प्रसार ज्यास्त व्यवस्थित होतो असे दिसते. ह्याच बी-महात्म्याचा दाखला देत एक गृहस्थ मुंबई-पुणे प्रवासात निरनिराळ्या झाडांच्या बियांची छोटी छोटी पुडकी करतात व रेल्वे-डब्याच्या दारातून जिथे जंगल लागते तिथे गाडीतून फेकतात. ते हे पावसाळ्यात करतात त्यामुळे बिया लवकर अंकुरतात व जंगले जोपासली जातात. हे बीचेच महात्म्य आहे.
ह्याच बी चे महात्म्य शेतकरी ओळखतात व जे पेरायचे त्याचे बियाणे अगदी चांगल्या अवस्थेचे, गुणाचे असे जोखून घेतात. कारण ज्या प्रतीचे बी असेल तसेच पीक येणार हा त्याचा विश्वास असतो व निसर्गाचा नियम असतो. ह्याच साठी जे पीक बियाणे म्हणून घ्यायचे असते ( सीड प्लॉट ), त्याची सर्व दृष्टीने चांगली निगराणी ठेवावी लागते. कारण चांगल्या बी पासूनच चांगले बियाणे मिळते. शुद्ध बीजा पोटीं फळे रसाळ गोमटी !
---------------------------------------------------------------------

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११
वैद्य झाला तुका
----------------------------------------------------------------------------------------
वैद्य झाला तुका:१
----------------------------------------------------------------
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥1॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पाहे बोल प्रीतीचे ॥2॥
तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥3॥
----------------------------------------------------------------------------------------------
आदर्श वैद्य कसा असावा ह्याचे तुकाराम महाराज इथे स्मरण करत आहेत. आदर्श वैद्य हा पांडुरंगासारखा ( पंढरीराव) असावा. पांडुरंग जसा शरण आलेल्या भक्ताचा अंतर्भाव जाणून घेतो तसा आदर्श वैद्य प्रथम पेशंटच्या शरीरात त्याला ( पेशंटला) माहीत असलेले अगर माहीत नसलेले असे कोणते रोग झाले आहेत त्याचे निदान करतो. त्याला कोणत्या रोगाची बाधा झाली आहे ते जाणून घेतो. जसा रोग असेल तशा त्यावर लागू होणार्या वृक्षवल्लींचे, जडीबुटींचे, औषध देतो. परमेश्वर जसा आपल्या भक्ताची चिंता वाहतो व त्याला एक पैही खर्च लागू नये अशी काळजी घेतो तशीच काळजी एका आदर्श वैद्याने आपल्या रुग्णाची घ्यायला हवी. त्याला भारी मोलाची औषधे घ्यायला भाग पाडू नये, त्याचा एक रुपयाही खर्च होणार नाही असे पहावे ( नेदी रुका वेचों मोल ). महागडी औषधे घ्यायला न लावता, जी योग्य आहेत व जी हमखास लागू होणारी औषधे आहेत तीच त्याने द्यावी. आजच्या काळात तुकाराम महाराज असते तर कदाचित म्हणाले असते की आदर्श वैद्याने रोग्याला विनाकारण महागड्या टेस्ट करायला लावू नये, इतके आजकाल महागड्या परीक्षांचे स्तोम माजलेले आहे. परमेश्वर जसा आपल्या भक्ताचे अंतर्मन व अंतर्भाव आपोआप ओळखतो तसे आदर्श वैद्याने केवळ जुजबी नाडी परीक्षेने रोग्याचा रोग पीडा अचूक ओळखावी. रोगाची जाण होणे ही अर्धी लढाई जिंकण्यासारखेच असते. एकदा रोग निदान झाले की त्यावर उपाय म्हणून आपल्याकडे वनस्पती, वल्ली, जडी बुटी अशा प्रकारची औषधे हमखास असतात व ती एकदा वैद्याच्या सल्ल्याने योग्य मात्रेने घेतली की माणसाचा रोग लगेच गायब व्हायला वेळ लागत नाही. पांडुरंगाला जशी दीन गरीब भक्ताची दया असते व त्यांची तो चिंता वाहतो तसेच आदर्श वैद्याने आपल्या गरीब पेशंटस्ची काळजी करायला हवी. त्यांना आधीच महागाईने जीव मेटाकुटीला आलेला असतो. तेव्हा त्यांना महागडी औषधे न देता रास्त किंमतीची व अगदी परिणामकारक अशी औषधे, तीही माफक किंमतीचीच, द्यावीत.
तुकाराम महाराज आजच्या काळात असते तर ते खचितच आजकाल रोगापेक्षा औषधांच्या दुष्परिणामांबाबत बोलते झाले असते. आजकाल आधुनिक मेडिकल शास्त्रातल्या ऍलोपॅथीच्या प्रथेप्रमाणे आपण जी औषधे घेतो त्यांचा रोगावर प्रभाव पडण्याबरोबरच रोग्याच्या इतर व्यवस्थांवर गैरपरिणाम करणारे प्रभाव पडतात असे आपण पाहतो. आणि इथेच आयुर्वेदाचे महत्व कोणालाही पटावे. कारण ह्यातली औषधे रोगावर प्रभावी ठरतातच व त्याचबरोबर रोग्यावर इतर दुष्परिणाम करीत नाहीत.
रोग्याला व्याधीची पीडा सहन करीत असताना ज्या वेदना होतात, पीडा होतात त्यातून त्याला वाचवणारा वैद्य हाच त्याला त्यावेळी परमेश्वरासारखा असतो ह्याची जाणीवही तुकाराम महाराज इथे वैद्याला पंढरीरावाची उपमा देऊन फार छान करून देतात. हे वर्णन करताना ते रोग्याची मनोव्यथा फार खुबीने चितारत आहेत. व त्यावर आदर्श वैद्याने कशी करुणा वर्षावी त्याचा उपदेश करतात.
-------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

वैद्य झाला तुका 1

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११
गायनँक तुका
झाला तुका गायनॅक :१
पायाळू:
----------------------------------------------
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥1॥
सिद्ध महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥
पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥2॥
तुका ह्मणे तेथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥3॥
-----------------------------------------------------------------------------------------------
खूप जणांनी लुटूनही न संपणारी अशी जुनाट खाण पंढरीत सापडली आहे. सिद्ध पुरुषांनी व महामुनींनी ही जतन केलेली होती. पण सामान्यांना ती सापडत नव्हती. जो माणूस जन्मताना डोक्याकडून न जन्मता पायाकडून जन्मतो त्याला पायाळ किंवा पायाळू म्हणतात. अशा पायाळू माणसांना खास दैवी शक्ती असते. त्यांना भूमिगत धन सहजी दिसते. तसेच जमीनीखाली पाणी कुठे लागेल ह्याचा अंदाज पायाळू माणसाला अगदी बिनचूक लागतो. अजूनही खेड्यापाड्यात विहिर कुठे खणावी त्याचा अंदाज घेण्यासाठी पायाळू माणसालाच बोलावतात. पुंडलीक हा असाच पायाळू असल्याने त्याने ही भूमिगत धनाची जागा, पांडुरंग, जगाला दाखविला. तिथे मी दुबळा होतो पण तरीही माझ्या वाटेला हे पांडुरंगाचे प्रेम थोडेबहुत आले आहे.
वरील अभंगात पांडुरंग ही एक प्रकारची भूमिगत खाण कशी आहे ह्याचे कौतुक असले तरी जो पायाळू माणसाचा दृष्टांत दिला आहे तो त्या काळीही तुकारामाला गायनॅकॉलॉजीची किती सविस्तर माहीती होती हे दाखविणारा आहे.आपण आजकाल जाणतोच की मुले जन्मताना प्रथम डोक्याकडून बाहेर येतात. पण बर्याच वेळा ती पायाकडून वा ढुंगणाकडूनही जन्मतात. अशा पायाकडून जन्मणार्यांना आपल्याकडे पायाळू म्हणतात. नेममीप्रमाणे डोक्याकडून जन्मणार्या मुलांना मायाळू म्हणतात. पायाळू मुले बर्याच वेळा अशक्त राहतात व त्यांना पाण्याचे भय असते असे पूर्वी समजत. आजकालच्या प्रसूती-शास्त्रात पायाळू मुलांना ब्रीच बेबी किंवा त्यांच्या जन्माला ब्रीच जन्म म्हणतात. ( ब्रीच बेबीची जन्माच्यावेळेसची अवस्था फोटोत दाखवली आहे ).
आपल्याकडे मुलांच्या जन्माला मोठा समर्पक शब्द आहे: "बाळंतपण" ! नैसर्गिक प्रक्रीयेने मूल किंवा बाळ जन्मते खरे, पण त्या दरम्यान हजार धोके संभवतात व जाणकार डॉक्टरांची म्हणूनच आवश्यकता असते. नीट व्यवस्थित जन्मले तर बाळ, नाही तर अंत, असाही कोणी बाळंतपणाचा अर्थ काढतात. तो अगदी वस्तुस्थिती दाखवणारा आहे. जर नैसर्गिक प्रथेने, काहीही डॉक्टरी खबरदारी घेतली नाही, तर बाळांच्या मृत्यूचे प्रमाण दर लाखामागे १५०० बाळांचा मृत्यू, इतके ज्यास्त असते. अर्थात आजकाल आधुनिक सोयी व वैद्यकीय साधनांमुळे हे मृत्यूचे प्रमाण सुधारलेल्या देशांत अवघे, दर लाखामागे १० मृत्यू, इतके कमी झाले आहे. आजकाल अशा अवघड बाळंतपणात सीझेरियन शस्त्रक्रिया करून बाळांचा जन्म बिनधोक करतात हे सर्वश्रुतच आहे.

मंगळवार, २६ जुलै, २०११
भेसळीचे बीज
-----------------------------------------------------------
१) भेसळीचे बीज
--------------------------------------------------------------
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥
नये पाहों कांहीं गोर्हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥
-------------------------------------------------------------
आजकाल जेव्हा आपण काही शेतकर्यांच्या व्यथा पाहतो तेव्हा भेसळीच्या बियाणांपायी त्यांना किती नुकसान होते त्याचा भीषणपणा आपल्यासमोर उभा राहतो. आधी शेताची मशागत करावी, बैल अथवा ट्रॅक्टरने नांगरणी करावी, योग्य ती खते द्यावीत व पावसाची प्रतिक्षा करावी, पाऊस झाल्यावर चांगली बियाणे घेऊन पेरणी करावी, उगवलेल्या पिकाचे संवर्धन करावे त्याची राखण करावी हे सगळे खटाटोप करीत असताना बियाणेच जर भेसळीचे असेल तर सर्व श्रमच वाया जातात. पीक चांगले येत नाही. शेतकर्यांच्या ह्या सर्व कष्टाच्या वाया जाण्यामागे केवळ भेसळीचे बियाणे हेच असते. अशावेळी ह्या भेसळीमागे जे लोक आहेत त्यांची निर्भत्सना करावी तेव्हढी कमीच पडेल.
तुकाराम महाराजांनी नेमके हेच हेरून जे बियाणात भेसळ करतात त्यांची यथेच्छ कान-उघाडणी व छीथू केली आहे. हे लोक किती नीच असतात असे दाखविताना ते त्यांना विष्ठा भक्षण करणारे असेही म्हणतात. असल्या ओंगळ माणसांचे मित्रही ओंगळच असतात असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा बियाणाची भेसळ करणारे शेतकरी, अधिकारी, व्यापारी ह्यांची जी चांडाळ चौकडी असते त्यालाच तुकाराम महाराज दूषणे देत आहेत हे सहजी ध्यानात यावे. ह्यांची छी:थू करताना मग तुकाराम महाराज त्यांच्या ह्या कुकर्माची तुलना हागणदारीशी करतात व त्याचा अंत जसा चांगल्या लोकांनी पाहू नये असा सल्ला देतात तसेच असल्या दुर्जनांचे संग, संत व चांगल्या मंडळींनी धरू नये असेही बजाऊन सांगतात. भेसळीच्या बियाणाला अस्सल बियाणासारखे गुण नसतात तर अमंगळ असेच अवगुण असतात. असल्या भेसळीच्या बियाणाकडे नुसते पाहणेही म्हणजे शीण आणणारे आहे. असल्या भेसळ करणार्यांकडे "आपली छी:थू" हेच भांडवल असल्याने त्याचा काही फायदा होईल, अशी सुतराम शक्यता नसते.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी", हे शुद्ध बियाणाची महती सांगणारे वचन सगळयांनाच माहीत असते. पण भेसळीच्या बियाणाचा धि:कार करणे हे ज्यास्त महत्वाचे आहे, हे पटून तुकाराम महाराज भेसळीची निर्भत्सना करतात. ती फारच अगत्याची आहे. कारण ह्याच भेसळीच्या बियाणापायी शेतकरी उध्वस्त होतो व मग त्याला जगवणे अवघड जाते. शेतकर्यांशी संबंधित असणार्या सगळ्या व्यक्तींनी, संस्थांनी, सरकारी अधिकार्यांनी तुकाराम महाराजांच्या ह्या वचनाप्रमाणे भेसळीविरुद्ध मोहीमच काढावी इतका महत्वाचा हा अभंग आहे.
-----------------------------------------------------------------------------

सोमवार, ११ जुलै, २०११
तुकारामाच्या गजला --3
तुकारामाच्या गजला---३
६) तोवरी तोवरी शोभतील गारा
तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा:
तोवरी तोवरी शोभतील गारा । जंव नाही हिरा प्रकाशला ॥
तोवरी तोवरी शोभती दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥
तोवरी तोवरी सांगती संताचिया गोष्टी । जंव नाही भेटी तुक्यासवे ॥
तोवरी तोवरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिले नाही ॥
तोवरी तोवरी सिंधु करी गर्जना । जंव त्या अगस्तिब्राह्मणा देखिले नाही ॥
तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही ॥
तोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥
तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे । जंव तुक्याचे दर्शन जाले नाही ॥
आता मिर्झा ग़ालिबची ही रचना पहा :
दाम हर-मौज में है हल्क़ा-ए-सदकामें-नहंग
देखें क्या ग़ुजरे है क़तरे पे गुहर होने तक
आ़शिकी सब्र-तलब और तमन्ना बेताब
दिल का क्या रंग करूं ख़ूने-जिगर होने तक
हमने माना कि तग़ाफुल न करोगे, लेकिन
ख़ाक हो जाएंगे हम तुमको ख़बर होने तक
परतवे-ख़ुर से है शबनम को फ़ना की तालीम
मैं भी हूं एक इनायत की नज़र होने तक
यक-नज़र बेश नही, फ़ुर्सते-हस्ती ग़ाफ़िल
गर्मी-ए-बज़्म है इक रक़्से-शरीर होने तक
ग़मे हस्ती का "असद" किससे हो जुज़ मर्ग इलाज
शम्अ़ हर रंग में जलती है सर होने तक
तोवरी तोवरी व होने तक ह्या शब्दांवर सगळी रचना गुंफणे पाहिले की तुकारामाची ही ग़झलच वाटावी.
८) इतुलें करीं देवा ऐकें हें वचन
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥२॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥३॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥
वरील अभंगात तुकाराम महाराजांचे जे मागणे आहे, ते "सगळे संपूर्ण नाही तरी इतके तरी दे " अशा वळणाचे आहे. हेच मागणे ग़ालिबनेही "तो दे " अशा ढंगाने खालील ग़जलेत मांडले आहे. शिवाय दोघांचे मागणे देवाकडेच आहे. फक्त गा़लिब दारू पीत असल्याने त्याने "प्याला गर नही देता, न दे, शराब तो दे" हे म्हणणे तुकाराम महाराजांना लागू होत नाही :
वो आके ख्वाब में तस्कीने-इज़्तिराब तो दे
वले मुझे तपिशे-दिल मजाले-ख़्वाब तो दे
करे है क़त्ल लगावट में तेरा रो देना
तेरी तरह कोई तेगे-निगह की आब तो दे
दिखाके जुम्बिश-लब ही तमाम तर हमको
न दे तो बोसा, तो मुंह से कहीं जवाब तो दे
पिला दे ओक से साक़ी, जो हमसे नफरत है
प्याला गर नहीं देता, न दे, शराब तो दे
"असद" ख़ुशी से मेरे हाथ-पांव फूल गये
कहा जो उसने, जरा मेरे पांव दबा तो दे
९) बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी
साधारण चारशे वर्षांपूर्वी गझल निर्माण झाली असे म्हणतात. त्याच काळात तुकाराम महाराज होते. गझलेत जसे भोगलेल्या दु:खाचे कढ असतात तसेच तुकारामांच्या अभंगात ओढगस्तीच्या संसाराचे चटके असतात. सूफी गझलेत जसे देवाच्या शरणावस्थेतली झिंग असते तसेच तुकारामांच्या अभंगात भक्ती रसाचा लोट असतो. गझलेत जसे वृत्ताची अट असते तशीच अभंगात दुसर्या व तिसर्या चरणांशेवटी यमकाची अट असते. ( तुलना करण्यासाठी समजा आपण अभंगातला चौथा चरण अलीकडे घेतला तर अभंग हे वृत्त यमकाचे होऊन गझलेच्या जवळ जाते. जसे खालच्या अभंगातला पहिला शेर जर असा लिहिला : बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी । आली रसा बहुत या गोडी ॥ तर साक्षात गझलच्याच वळणाचा होतो.). गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र असतो तसेच सर्व गझलेत एक सूत्र गुंफलेले असते. ह्या अभंगातही तसेच दिसते. शिवाय गझलेत एखाद्या शब्दाचा नाद घेऊन त्याभोवती रचना फेर धरते, तसेच ह्या अभंगात "बहु" ह्या शब्दाभोवती सगळी रचना उभारते.
बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥
बहु सोसें सेवन केले बहुवस । बहु झाला दिस गोमटयाचा ॥
बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥
बहु तुका झाला बहु निकट वृत्ति । बहु काकुलती येऊनिया॥
तुकाराम महाराजांच्या "बहु" या शब्दाच्या भोवती रुंजी घालण्यावरून ग़ालिबचा एक प्रसिद्ध शेर आठवतो. तो असा :
हजारों ख्वाहिशें ऐसी, कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले
इथे "बहु निकट वृत्ती " ह्या ग़ालिबच्या ख्वाहिशे व अरमान सारख्याच भासतात. बहु म्हणजे पुष्कळ. तुमची स्तुती करण्याची आवड असल्यामुळे तुम्हाला पुष्कळ नावे ठेविली आहेत. त्या योगाने भक्तिरसाला पुष्कळ गोडी आली आहे. मी त्या नांवांचे फार सोसाने पुष्कळ दिवस सेवन केले. त्या योगाने पुष्कळ चांगले दिवस उदयास आले आहेत. देव हा पुष्कळांना पुरून पुष्कळांकरितां उरला आहे व पुष्कळ वेष घेऊन त्याने पुष्कळांचा उद्धार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपली वृत्ती त्याच्या ठिकाणी पुष्कळ काकुळतीस येऊन प्रकट केली ( देवाच्या पुष्कळ जवळ ऐक्यरूपाने राहणारा झालो आहे,) अशा अर्थाचा हा अभंग आहे. ह्या पुष्कळाच्या भोवती जसा हा अभंग क्रीडा करतो तशीच "पुष्कळ" ह्या शब्दाभोवती रम्य चित्रण करणारे दुसरे एक कवी आहेत पु.शि.रेगे. त्यांची पुष्कळा नावाची एका प्रेयसीला उद्देशून केलेली ही गझलेच्या अंगाची कविता पहा:
पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन ;
पुष्कळातली पुष्कळ तू
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी.
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे ,
देताना पुष-पुष्कळ ओठ ;
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ ऊर,
पुष्कळाच तू, पुष्क-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी.
"बहुतां पुरला, बहुतां उरला" हे तर साक्षात सर्वोदयाचे ( सगळ्यात ज्यास्त जणांचे सगळ्यात ज्यास्त भले ) तत्व झाले. ते असे चपखलपणे विठठलासाठी वापरले आहे.
१०) पावलों पंढरी वैकुंठभवन
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥
"धन्य आजि दिन सोनियाचा" असे वाटायला लावणारे मिळणे ही फारच समाधानाची परमोच्च भावना आहे. तुकाराम महाराज तीच वर दाखवीत आहेत. ह्यात "पावलों" हा नाद अगदी ग़जलेच्या वळणाचा आहे. ह्याच वळणाची ग़ालिबची "पाया" ह्या शब्दाभोवती घुटमळणारी एक ग़जल आहे.
मिर्झा ग़ालिबची रचना पहा:
कहते हो, न देंगे हम, दिल अगर पडा पाया
दिल कहां कि गुम कीजे ? हमने मुद्दआ़ पाया
इश्क़ से तबीयत ने जिस्त का मज़ा पाया
दर्द की दवा पाई, दर्द बे-दवा पाया
दोस्त दारे-दुश्मन है, एतमादे-दिल मालूम
आह बेअसर देखी, नाला नारसा पाया
सादगी व पुरकारी, बेखुदी व हुशियारी
हुस्न को तग़ाफुल में जुरअत-आ़ज़मा पाया
गुंन्चा फिर लगा खिलने, आज हमने अपना दिल
खूं किया हुआ देखा, गुम किया हुवा पाया
हाले-दिल नहीं मालूम, लेकिन इस क़दर...यानी
हमने बारहा ढूंढा, तुमने बारहा पाया
शोर पन्दे-नासेह ने ज़ख्म पर नमक छिडका
आपसे कोई पूछे, तुमने क्या मजा पाया
११) ग़जलच्या वळणाच्या इतर काही रचना:
गजल-सम्राट कवी सुरेश भट ग़जलासंबंधी म्हणतात की ग़झलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग हे एक प्रकारच्या कळवळ्यातून आलेले असल्याने ते ग़झलेच्याच जातीचे आहेत असे दिसेल. तसेच ते कमीत कमी शब्दात ज्यास्तीत ज्यास्त सांगणारे असल्याने ग़झलच्या स्वभावाचे आहेत. ग़झलेतला शेर जणू आपण बोलत आहोत असा सहजी असावा असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा ते तुकारामाच्या रचनांसंबंधीच बोलत असावेत इतक्या तुकारामाच्या रचना लोकांशी संवाद साधणार्या आहेत. त्या इतकी वर्षे टिकून आहेत त्याचे रहस्यही तेच असावे. सुरेश भटांचे एक वचन आहे की काही वर्षांपुरता बोभाटा म्हणजे शाश्वत कीर्ती नव्हे, लिहिणार्याने स्वत:वर सतत जागता पहारा ठेवावा. हे वचन जणू काही तुकारामांना उद्देशूनच आहे इतके ते तुकारामांना लागू पडते. भट असेही म्हणतात की कोणत्याही कवीचा अखेरचा फैसला पाच-दहा वर्षात होत नसतो. साडे-तीनशे वर्षे टिकलेल्या तुकारामाच्या काव्याला हे तर फारच चपखल बसते. ग़झलेसंबंधी सुरेश भटांच्या व इतरांच्या अपेक्षा पुर्या करणारे तुकाराम महाराजांचे वरील अभंग व खालील रचना, छे, ग़झला, ह्या कसोटीला पुरेपूर उतरतात असे कोणालाही पहिल्याच वाचनानंतर प्रतीत होईल.
काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥
काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥
काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥
काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥
काय बा करीसी दंभलौकिकातें । हित नाहीं मातें तुका म्हणे ॥४॥
----------------
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥
देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥
देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥
देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥४॥
पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥
-------------------------
लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यापें ॥
लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥
लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्याचे ॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥
लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥
-------------------------------------------------------------------------
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥
लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥
लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥
----------------------------------------------
शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
( १८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई: ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२ )
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)