तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा
आग्रह-लेख --- ९
तुकाराम महाराज
आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय
म्हणाले असते ?
९ ---- नवीन मंत्रालय, “आनंद मंत्रालय” सुरू होणार
!
-------------------
आनंदाचे डोहीं
आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचें॥1॥
काय सांगों झालें कांहीचियाबाही । पुढें चाली
नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा
तेथें बिंबे ॥2॥
तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा
आला ॥3॥
( मी आनंदाचा,
ब्रह्मानंदाचा, डोह झालो आहे, म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्या लाटा येतात, कारण
आनंदाचे अंग आनंदच असते. मला जे काही सुख झाले ते काहीच्या बाहीच आहे ; त्याचे मी
काय वर्णन करू ? कारण त्याच्या प्रीतीने ( प्रपंचाची पुढील हाव संपली. पोटातील
गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात, कारण त्या ठिकाणचा ( गर्भाचा ) स्वभाव
तेथेच आईमध्ये प्रगट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे जो अनुभवाचा ठसा
माझ्या अंत:करणात उमटला आहे तोच माझ्या वाणीवाटे प्रगट झाला. ---जोग प्रतीप्रमाणे
).
म्हणजे आनंदाचा
प्रत्यक्ष अनुभव लोकांना आल्याशिवाय त्यांच्याद्वारे आनंद प्रगट होणार नाही !
----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा