बुधवार, ४ जुलै, २०१८

तुकाराम टाइम्स 
------------------------ 
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---३ 
--------- 
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
३ ---- पाकिस्तानातल्या निवडणुकीत एक उमेदवार कचऱ्याच्या ढिगावर, नाल्यात बसून प्रचार करीत आहे.
-------------------
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥1॥
काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥
काया वाचा मनें अघटित करणें | चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ||
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदाभेद ।
पितृवचनी घडली अवज्ञा अविचारी । कुटिल कुचर वादी निंद्य ॥
आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्दहीन ॥4॥
संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृद्धि पापा ।
तुका ह्मणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ||
----------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा