रविवार, ८ जुलै, २०१८



तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ७


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
   ---- माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम ह्यांच्या घरी नोकरांकरवी चोरी
-----------------
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥1॥
 धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥
 सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥2॥
 तुका ह्मणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई  ॥3॥
( हे देहरूपी घर देवाचे असून त्यातील अज्ञान व सर्व कामक्रोधादी विकाररूपी द्रव्याची चोरी देवानेच केली, म्हणून देवानेच देवाला लुटून भिकारी केले. आता कोणी धावणारे लोक हो, धावा. ( असे द्विवार सांगतो ). त्या चोराचा शोध तपास लागत नाही. आता कोणत्या गावास जाउन त्याचा शोध घ्यावा ? हा चोर माझ्याबरोबर असून देहरूपी घरातच राहत होता. त्याने संधी पाहून सर्व नाश केला. ( चित्तशुद्धीची संधि सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले, देहादी उपाधींचा निरास केला). तुकाराम महाराज म्हणतात, विचार करून पाहिले असता ह्या ठिकाणी कोणीच नाही. ( जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली . जीव आणि ईश्वर ह्यांचे परम ऐक्य झाले. अशा द्वैत स्थितीत ) आता नागवला कोण व कोणाचे काय चोरीस गेले हे सांगता येईल काय ?).---जोग प्रतीप्रमाणे
---------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा