तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---४
---------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
४ ---- हंसरत्नविजय जी महाराज ह्या जैन मुनीचा फक्त पाणी पिऊन १८० दिवसांचा दुसऱ्यांदा उपवास
-----------------
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥
काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥
काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥
तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥
--------
( अहो देवा, तुमच्या भेटीकरिता मी आपला देह करवतीने कापून घेऊ अगर दुसऱ्या एखाद्या शस्त्राने तोडून घेऊ किंवा एखाद्या धगधगीत अग्नीत टाकून जाळून घेऊ ? का वनामध्ये जाऊ ; शीत, उष्ण, तहान ह्यांचे ताप सहन करू ; अगर मौन घेऊन बसू ? का सर्व अंगाला भस्म लावू , कोणत्या देशाला हिंडू , अगर चारी खुंट फिरू ? का उपाशी राहून अन्न टाकून देऊ , का मी आपल्या जिवाचा नाश करून टाकू ? तुकाराम महाराज म्हणतात , हे पांडूरंगा , तुझ्या भेटीकरिता कोणता उपाय करावा , ह्याविषयी मला तू ज्ञान दे.).
---------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा