तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा
आग्रह-लेख --- १३
----------------
तुकाराम महाराज आज जर
एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले
असते ?
१३ -------- दूध आटणार ( दुधाचा संप )
-----------------
रिद्धिसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं
भाकरी भक्षावया ॥1॥
लोडें वालिस्तें पलंग
सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
पुसाल तरि आह्मां
वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी राजे
त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥3॥
---------------
जणू काही सध्याची प्रजा ही
संतांप्रमाणे उदास झाली आहे व म्हणून दारी कामधेनू सारख्या अखंड दूध देणाऱ्या
गाई-म्हशी असूनही दूध आटणार आहे ! घरी लोड, पलंग आहेत पण नेसायला लंगोटी नाही.
म्हणायला आम्ही स्वर्गात आहोत पण राहायचा ठावठिकाणा नाही. आहोत राजे पण कोणाचा
सम्बन्ध नाही. अशी संतांसारखी उदासी यायला आता वेळ लागणार नाही !
---------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा