तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---५
तुकाराम महाराज
आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय
म्हणाले असते ?
५ ---- मुंबईच्या विकासाचा पायाच “भुसभुशीत”
--------------
मजुराचें पोट भरे
। दाता उरे संचला ॥1॥
या रे या रे
हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥
रोजकीर्दी होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥2॥
तुका ह्मणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥3॥
( जो कोणी दाता
आहे त्याचेजवळ धनाचा संचय असल्यामुळे त्याचे दातृत्व कायम असते ; तेथे परमार्थाची
इमारत बांधण्याच्या कामावर मजुरी करणारास आपल्या पोटापुरते मिळते. अहो जन हो,
तुम्ही आपल्या संसाराच्या कामावर माती घालून लवकर धावत ह्या ठिकाणी या असे द्विवार
सांगतो. ह्या ठिकाणी रोजमेळाची कीर्द आहे म्हणून रोजी हिशोबाची झडती होऊन रोकड
शिल्लक, पर्वताप्रमाणे असते. तुकाराम महाराज म्हणतात, आपापल्या सेवेप्रमाणे
प्रत्येक मनुष्यास प्राप्ति होते. ह्या करिता आपल्या शरीराने कष्ट करून शरीर
झिजवावे व परमार्थरूपी इमारतीचा असा खोल पाया घालावा. )
-----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा